महिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...

महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 22, 2014, 04:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रियाध
महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.
सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. ही बंदी झुगारून लावत एका २३ वर्षीय महिलेनं गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पतीसोबत चार चाकी गाडी पत्नीनं रस्त्यावर काढली होती. यावेळी, तिला पोलिसांनी अडवलं आणि देशाच्या नियमांनुसार तिला दंडही ठोठावला... इतकंच नाही तर तिच्या पतीसहीत तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.
वाहतूक खात्याने पतीला ९०० रियालचा (२४० डॉलर्स) दंड ठोठावला, तसेच त्यांची कार आठवड्यासाठी जप्त करण्यात आली. पण, वाहतुकीचे नियम मोडले म्हणून नाही तर इथल्या महिलांच्या बाबतीत असणारे कायदे मोडले म्हणून...
पुन्हा असा `गुन्हा` करणार नाही, असं हमीपत्रही या पती-पत्नीकडून पोलिसांनी लिहून घेतलं आणि त्यांना जामिनावर सोडलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.