www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद
पाकिस्तानातील नागरीक भारतीय जनता पक्षाची वेबसाइट पाहू शकत नाही, कारण भाजपनं आपली इंटरनेट पेज पाकिस्तानात ब्लॉक केलंय. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या पोर्टलवर जावू शकतात.
पाकिस्तानातून लॉग इन केल्यावर जे पेज समोर येतं, त्यात एरर १००९ असं येतं. ही वेबसाइट भाजपची असून त्यांनी पाकिस्तानात आपल्या आयपी ऍड्रेसला प्रतिबंधित केलंय. पाकिस्तानातून लॉग इन करणाऱ्या लोकांना खाजगी नेटवर्कचा वापर करावा लागतोय. ज्याद्वारे ते पाकिस्तानी आयपी ऍड्रेस लपवू शकेल आणि भाजपच्या वेबसाइटपर्यंत पोहोचू शकेल.
मात्र अनेकांना ही बाब पचत नाहीय. भाजपनं नुकतंच आपलं ट्विटर अकाऊंटसोबत यूपीए सरकारच्या विरोधातील एका आरोपपत्रासोबत जोडलंय. मात्र पाकिस्तानातून लॉग इन केल्यास ही लिंक काम करत नाही. काही लोकांच्या मते ही वेबसाइट ब्लॉक केल्यामुळं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर भाजपला वेबसाइट हॅक होण्याची भीती वाटतेय तर त्यांना माहिती असायला हवं की हॅकर्स वेबसाइट हॅक करायला स्वत:चा आयपी ऍड्रेस वापरत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.