तिसऱ्या स्तनासाठी महिलेनं खर्च केले २० हजार डॉलर

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या एका मसाज थेरपिस्टनं आणखी एक स्तन मिळविण्यासाठी सर्जरी करवली. तिसरं स्तन मिळविण्यासाठी तिनं २० हजार डॉलर खर्च केले. मसाज थेरपिस्टचं नाव जॅस्मिन ट्रायडेव्हिल आहे. तिला एमटीव्हीच्या शोमध्ये यायचंय. २१ वर्षीय जॅस्मिननं काही महिन्यांपूर्वी ही सर्जरी केलीय.

Updated: Sep 23, 2014, 08:20 AM IST
तिसऱ्या स्तनासाठी महिलेनं खर्च केले २० हजार डॉलर title=

न्यू यार्क: अमेरिकेतील फ्लोरिडाच्या एका मसाज थेरपिस्टनं आणखी एक स्तन मिळविण्यासाठी सर्जरी करवली. तिसरं स्तन मिळविण्यासाठी तिनं २० हजार डॉलर खर्च केले. मसाज थेरपिस्टचं नाव जॅस्मिन ट्रायडेव्हिल आहे. तिला एमटीव्हीच्या शोमध्ये यायचंय. २१ वर्षीय जॅस्मिननं काही महिन्यांपूर्वी ही सर्जरी केलीय.

वेबसाइट हफिंगटन पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार जॅस्मिनला तिसरं स्तन मिळविण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. या सर्जरीसाठी तिनं ५० ते ६० डॉक्टर्सना संपर्क केला होता. मात्र या सर्व डॉक्टर्सनी सर्जरी करायला नकार दिला. डॉक्टरांनी म्हटलं हे त्यांच्या व्यवसायाच्या विरुद्ध आहे. 

वेबसाइटनुसार जॅस्मिननं सांगितलं की, सर्जरीसाठी तिनं पैशांची सोय करायला दोन वर्ष वाट पाहिली. सतत दोन वर्ष तिनं पैसे जमवले आणि नंतर सर्जरी केली. जॅस्मिननं एका रेडिओवर बोलतांना सांगितलं की, ‘एमटीव्हीच्या शोमध्ये सहभागी होणं माझं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न आहे. मी एक-एक पैसा जोडून ही सर्जरी केलीय. या सर्जरीद्वारे मला नाव कमवायचंय, असं सांगायलाही जॅस्मिन विसरली नाही.’ पण आपल्या या सर्जरी मागचं खरं कारण सांगतांनी जॅस्मिन म्हणते, “मला पुरुषांसमोर खराब दिसायचं आहे, म्हणून मी ही सर्जरी केली.  मला आता कोणत्याही पुरुषासोबत डेटिंग करायची नाहीय.”

या सर्जरीनंतर जॅस्मिनचे कुटुंबिय तिच्यावर नाराज झाले आहेत. आई आणि बहिणीनं बोलणं सोडलंय तर वडिलांना मुलीची लाज वाटलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.