ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

Updated: Sep 22, 2014, 09:51 PM IST
ओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य... title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.

नवरात्र सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोदी हे अमेरिकेला रवाना होणार आहेत. अमेरिकन दौऱ्यादरम्यान उपवासवर असलेले मोदी काहीही खाणार नाहीत... केवळ पाणी पिऊन आणि फलाहार घेऊन ते आपला उपवास पूर्ण करतील. गेली 35 वर्ष नवरात्रातील नऊही दिवस मोदी कडक उपवास करतात... आणि यावर्षी जरी ते अमेरिकेत असले तरी ते उपवास ठेवणार आहेत. 

व्हाईट हाऊसमध्ये मोदींसाठी प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूतांकडून दिल्या जाणाऱ्या रिसेप्शनसाठी मेनू तयार आहे. परंतु, या दौऱ्यात मोदींना काहीही खाणं वर्ज्य असेल.  

याचबरोबर योगा, मेडिटेशन आणि संध्याकाळी पूजा हा त्यांचा रोजचा दिनक्रमही कायम राहणार आहे. मोदींच्या या उपवासाबाबत अमेरकेतील भारतीय दूतावासांना कळवण्यात आलं आहे. 

पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. पाच दिवसांच्या या दौऱ्यात त्यांची दोनदा बराक ओबामांशी भेट होणार आहे. 29-30 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची ते भेट घेतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.