उघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय !

 लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. 

Updated: Nov 30, 2015, 11:21 AM IST
उघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय ! title=

लंडन :  लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. 

वैज्ञानिकांनी ९० लाख वर्षापूर्वीच्या सापाचे अवशेषातून त्याच्या विकासाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. वैज्ञानिकांनी आधुनिक साप आणि अवशेष यांच्या सिटीस स्कॅनचा तुलनात्मक अभ्यास केला. तेव्हा स्पष्ट झाले की सध्याच्या सापांना पाय नसल्याबद्दल त्यांचे पूर्वज जबाबदार आहेत. 

एडिनबर्ग युनिवर्सिटीचे मुख्य संशोधक होंग्यु यी यांनी सांगितल्यानुसार सापांनी आपले पाय कसे गमावले या संदर्भात खूप काळापासून रहस्य होते. पण या अध्यातून यावर प्रकाश प़ला आहे. अध्ययानानुसार सापांचे पूर्वज हे बिळात राहत होते. त्यामुळे त्यांना सरपडण्याची सवय लागली. त्यांनी पायांचा उपयोग बंद केला. त्यामुळे जी गोष्ट उपयोग आली नाही ती गायब होते, या नियमांनुसार पुढील पिढीत सापांचे पाय गायब होत गेले. 

वैज्ञानिकांनी ३ मीटर लांब क्रेटेशियस सापांच्या विलुप्त जाती डिनिलिसया पॅटागोनिकाच्या कानाच्या आतील हाडचे सीटी स्कॅन परिक्षण केले. यावरून लक्षात येते की आधुनिक सापांप्रमाण डिनिलिसया पॅटागोनका सापाची गुहा (कॅविटी) आणि नली (कनाल)  सांपांच्या एकण्याची शक्ती नियंत्रित करते. वैज्ञानिकांनी ३ डी मॉडेलच्या आधारे जीवाश्मात कानाच्या आतील अंगाची तुलना आधुनिक सापांशीच्या अंगाशी केली. 

यात कानाची विशिष्ट रचना आढळली त्यामुळे शिकार आणि शिकाऱ्यांची ठावठिकाणा लागण्यात मदत मिळत होती. आता ही संरचना  पाणी आणि जमिनीवर राहणाऱ्या आधुनिक सापांमध्ये मिळत नाही. हे अध्ययन सायन्स एडवान्सेज या मॅक्झीनमध्ये छापून आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.