जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

Updated: Feb 27, 2016, 03:10 PM IST
जपानी लोक एवढे निरोगी का असतात ? title=

मुंबई: जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

जपानी नागरिक खातात कमी कॅलरी

इतर नागरिकांच्या तुलनेत जपानी 25 टक्के कमी कॅलरी खातात. कमी कॅलरी खाल्ल्यामुळे यकृत चांगलं राहतं. जपानी लोकांचं जेवणही पौष्टीक असंत. 

जपान्यांच्या डाएटमध्ये मासे

जपानी लोक आपल्या जेवणामध्ये माशांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ते आपल्यासारखाच चहा पितात, पण दुधाच्या चहाऐवजी ते ग्रीन टी पिणं पसंत करतात. ग्रीन टीमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. जे लोक दिवसातून 5 कप ग्रीन टी पितात त्यांच्या मृत्यूचा दर 26 टक्के कमी होतो.

पालेभाज्यांचा जास्त वापर

याबरोबरच जपानी लोकांच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचं प्रमाणही जास्त असतं. तसंच पूर्वेतल्या देशातील नागरिकांपेक्षा जपानी 6 पट जास्त भात खातात. जपानी लोकांच्या एका वेळच्या जेवणामध्ये 4 भाज्या असतात. काही समारंभ असेल तेव्हाच ते काटा चमचा वापरतात. 

जपान्यांचं गायन प्रेम

जपानी लोक गाण म्हणण्यावर विश्वास ठेवतात. गाण गायल्यामुळे तब्येत चांगली राहते, अशी त्यांची धारणा आहे. मित्रांबरोबर गाणं म्हणल्यामुळे आणि गप्पा मारल्यामुळे हृदय स्वस्थ राहतं. गाणं गाताना दिर्घ श्वास घ्यावा लागतो, तसंच गाण्याला दाद म्हणून जेव्हा टाळ्या वाजवल्या जातात तेव्हा आत्मविश्वास वाढतो, असं जपानमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

जपान्यांचा फिटनेसवर जास्त भर

शरीर फिट राहण्यासाठी जपानी लोक भरपूर चालतात. ओकिनावा शहरातल्या लोकांच्या घरात टेबल आणि खुर्च्याही कमी आहेत. जपानी लोक जमिनीवर बसून जेवतात. दिवसातून कमीत कमी 12 ते 13 वेळा उठबस केल्यामुळेही त्यांचं शरीर फिट राहतं.