जोहान्सबर्ग: ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सर्फिंग चॅम्पियन मिक फॅनिंगवर दक्षिण आफ्रिकेच्या जॅफरीस बे वर एक सर्फिंग इव्हेंट दरम्यान रविवारी शार्कनं हल्ला केला. मात्र मिकनं आपल्या बळानं आणि शौर्यानं शार्कचा मुकाबला केला आणि स्वत:चा जीव वाचवला. मिक फॅनिंगनं जे करून दाखवलं ते सामान्य माणसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मिकनं दक्षिण आफ्रिकेतील समुद्रात शार्कशी दोन-दोन हात केले. शार्कवर हातांनी वार करून शार्कची शिकार होण्यापासून तो वाचला. नंतर त्यानं सांगितलं की, मला असं वाटलं की, मला पकडलंय आणि मी लगेच समुद्रात उडी मारली. मी पहिले पोहून दूर जाण्याचा विचार केला. पण नंतर शार्कचा सामना करण्याचा निर्णय घेतला आणि शार्कच्या पाठीवर मुक्के मारले. यानंतर अचानक झालेल्या आक्रमणामुळं शार्क घाबरून वापस गेली.
टिव्हीवर सुद्धा या फायनलचं लाईव्ह दाखवलं जात होतं. हा लाईव्ह नजारा पाहणाऱ्यांमध्ये फॅनिंगची आई एलिझाबेथ सुद्धा होती. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशनसोबत ओल्या नयनांनी बोलत फॅनिंगची आई म्हणाली, जे काही मी पाहिलं ती घटना म्हणजे आतापर्यंतची माझ्या कुटुंबासोबत घडलेली सर्वात वाईट घटना होती. कारण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होत होतं.
पाहा हा जबरदस्त व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.