२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक

जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे. 

Updated: Jul 20, 2015, 02:55 PM IST
२०१४ या वर्षात उष्णतेचे उच्चांक  title=

न्यूयॉर्क : जगात उष्णता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, २०१४ हे साल अतापर्यंतचे सगळ्यात जास्त उष्णतेचे वर्ष आहे. ५८ देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे. 

या अहवालानुसार जमीन व पाण्याचे तापमान, समुद्राच्या पाण्याची पातळी आणि हरितगृह वायू यामध्ये २०१४ वर्षात एका विक्रमी वाढीची नोंद झाली आहे. 

नॅशनल रेकॉर्डद्वारे १९०१ सालापासून ते आजपर्यंत केलेल्या नोंदीनुसार २०१४ हे वर्ष सगळ्यात जास्त गरमीचे वर्ष म्हणून समोर आले आहे.
 
हा अहवाल संपूर्ण जगाच्या शेकडो शास्त्रज्ञांच्या आकड्यांचे प्रतिनिधीत्व करतो, आणि २०१४ या वर्षात काय झाले होते याचे स्पष्ट चित्र दाखवतो, असे वक्तव्य अहवाल तयार करणाऱ्या नॅशनल ओशनिक अॅंड अॅटमॉसफियर अॅडमिनिस्ट्रेशनचे थॉमस कार्ल यांनी केले आहे. 

फक्त तापमानातचं वाढ झालेली नाही, तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही विलक्षण वाढ झालेली आहे. या सगळ्याचाचं परिणाम म्हणजे  २०१४ या वर्षातील उष्णतेची वाढ असे कार्ल यांनी सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.