जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये एका टीव्ही पत्रकाराला रस्त्यावरून लाईव्ह देत असतांना दोन भामट्यांनी लूटलंय, विशेष म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
मिलपार्क हॉस्पिटलसमोर लाईव्ह देण्यासाठी उभा असलेला पत्रकार म्वोकोला लूटलंय, म्वोको यांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने त्याच्याकडून मोबाईल मागितला, तो देण्यास नकार दिल्यावर त्याला पिस्तूल दाखवलं.
या चोरट्यांना कॅमेऱ्याचा कोणताही धाक नव्हता, जाम्बियाचे राष्ट्रपतींच्या मेडिकल टेस्ट बाबत लाईव्ह देत असतांना या पत्रकाराला त्यांनी लूटलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्वोकोकडून एक लॅपटॉप आणि काही मोबाईल फोन या चोरट्यांना हिसकावून पळ काढलाय.
लूटीचा व्हिडीओ झाला व्हायरल
म्वोको म्हणतो, मला कळलंच नाही हे लोक अचानक कॅमेऱ्यांच्या समोर का आले, विशेष म्हणजे यावेळी लाईव्हचा लाईट लागलेला होता, आणि तो लाईट हे लोक पाहत होते.
या घटनेनंतर आपण सुरक्षित असल्याचं ट्वीटही म्वोको यांनी केलंय, लूट होत असतांनाची लिंक त्याने पोस्ट केलीय. दक्षिण आफ्रिकेचा एडिटर फोरमने सरकारला या घटनेनंतर धारेवर धरलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.