जर्मनी: जर्मनीमधील Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात एक गाय... तिचं नाव इमा.. या व्हिडिओत ती खूप नाराज दिसतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कारण तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे कदाचित कत्तलखान्यात नेलं जातंय.
इमा ज्या डेअरी फार्ममध्ये ते बंद होतंय. त्यामुळं तिला तिथून पाठवलं जातंय. आपण हा व्हिडिओ पाहिला तर इमाला जेव्हा कत्तलखान्यात न नेता दुसऱ्या ठिकाणी एका अभयारण्यात आणलं जातं. तेव्हा तिथं आपल्यासारख्याच इतर गायी पाहून, आजूबाजूची हिरवळ पाहून तिच्या जीवात जीव येतो.
जर्मनीत म्हाताऱ्या झालेल्या गायीला कत्तलखान्यात न पाठवता एका सामाजिक संस्थेनं Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात आणलं. तिथं दूध न देऊ शकणाऱ्या गायींना मोकळेपणानं जगता येतं.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.