भाजपचा पराभव ; पाकिस्तानींना फटाके फोडण्यासारखा आनंद, पण...

भाजपच्या पराभवावर पाकिस्तानात फटाके फोडण्यासारखा काहींना आनंद झालाय, कारण हाफीज सईद सारखे लोक पाकिस्तानात मोदींच्या विजयाची वाट पाहत होते, मोदींचा विजय झाला तर तणाव वाढवण्यात, चिथावणी देण्यात दहशतवादी संघटनांना मदत होते, अशा प्रकारचे ट्वीट पाकिस्तानींनी केले आहेत.

Updated: Nov 8, 2015, 01:37 PM IST
भाजपचा पराभव ; पाकिस्तानींना फटाके फोडण्यासारखा आनंद, पण... title=

इस्लामाबाद : भाजपच्या पराभवावर पाकिस्तानात फटाके फोडण्यासारखा काहींना आनंद झालाय, कारण हाफीज सईद सारखे लोक पाकिस्तानात मोदींच्या विजयाची वाट पाहत होते, मोदींचा विजय झाला तर तणाव वाढवण्यात, चिथावणी देण्यात दहशतवादी संघटनांना मदत होते, अशा प्रकारचे ट्वीट पाकिस्तानींनी केले आहेत.

पाकिस्तानात फटाके?

पाकिस्तानींचे ट्वीट वाचतांना तुम्हाला हा कल लक्षात येईल. पाकिस्तानात ट्वीटरवर  #Bihar हा हॅशटॅग ट्रेन्ड़ करतोय. पाकिस्तानात भाजपच्या विजयावर फटाके फोडले जात आहेत का? असं काही प्रेक्षकांनी ट्वीटवर विचारलं होतं, पण पाकिस्तानात भाजपच्या विजयावर कुठेही फटाके फोडल्याची बातमी अजून तरी नाही, पण फटाके फोडण्यासारखा आनंद झाल्याचं ट्वीटवरून दिसून येतंय, त्याची कारणं मात्र भारताला विरोध हे नसल्याचंही ट्वीटवरून स्पष्ट होतंय.

या ट्रेन्ड खालोखाल वसीम अक्रम, शेन वॉर्न, मोइन खान आणि इक्बाल सारखे क्रिकेटशी संबंधित ट्रेन्ड ट्वीट करत आहेत. मात्र #Bihar हा हॅश टॅग पाकिस्तानात ट्रेन्ड करतोय हे विशेष, मोदी यांच्या पराभवाने पाकिस्तानातील काहींना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

कारण दोन्ही देशांतील नेत्यांच्या प्रतिमेबद्दलचे हे गैरसमज असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानात भाजप हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा समज आहे.

पाकिस्तानींचे ट्वीट

सीनेटर शेरी रहमान ट्वीट करतात - फटाके?? क्रिकेटचा विषय राहिला असता तर आम्ही हा विचार केला असता, बिहारमधील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे, आमच्यासाठी नाही. 

अमीर मतीन लिहितात- बिहारमध्ये काँटे की टक्कर आहे, यावरून दिसेल मोदी भारत-पाकिस्तानात गेम चेंजर आहेत किंवा नाही. 

नसीम ज़ेहरा लिहितात - भाजपविरोधात बोलणाऱ्यांना काही भारतीयांना पाकिस्तानी म्हटलं जात आहे, हे खालच्या स्तराचं राजकारण आहे.

अली कामरान चिश्तीचं ट्वीट - जो न कटे आरी से वो कटे बिहारी से.

स्नायपर नावाचं एक हॅण्डल ट्वीट करतांना म्हणतंय - राजदीपजी येथे पाकिस्तानात हाफिज़ सईदसारखे लोक मोदींच्या विजयाची वाट पाहतायत, कारण त्यांची इच्छा आहे की, मोदींच्या विजयामुळे तणाव वाढवण्यास मदत होईल.

लाहौरहून सनम तासीरचं ट्वीट - आता काय भाजपवाले आम्हाला बिहारला पाठवतील?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.