सीरिया : अवघ्या ३० दिवसांच्या एका बाळाला मृत समजून त्यानं आपल्या हातात घेतलं... पण, याच बाळानं जेव्हा श्वास घेत हालचाल सुरू केली तेव्हा त्या सैनिकी हृदयाच्या कणखर दगडालाही पाझर फुटला.
गुरुवारी सीरियामध्ये ही घटना पाहायला मिळाली. बॉम्बस्फोटात इदलिब आणि अलेप्पो शहरातील सगळ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. यात २४ जणांनी आपले प्राण गमावले... यात सात मुलांचाही समावेश आहे.
बॉम्बस्फोट थांबताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. यावेळी मलब्याखाली अडकलेलं अवघ्या ३० दिवसांचं एक बाळ सापडलं. त्याचे श्वास थांबले होते... आणि अशातच मरणासन्न अवस्थेतील बाळानं हालचाल सुरू केली... हे पाहून त्याला वाचवणारा ओरडला... 'या अल्लाह'... आणि त्यानं आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
Video posted to social media shows a Syrian civil defense worker crying as he cradles a baby girl pulled alive from rubble. pic.twitter.com/OlYSKmaaCx
— Reuters World (@ReutersWorld) September 30, 2016
दरम्यान, रशियाकडून सीरियात केल्या जाणाऱ्या या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत हजारो जणांनी प्राण गमावलेत. जवळपास एक लाख मुलं अनाथ झालीत.