आयोवात 'ट्रंप कार्ड' पडलं मागे, क्लिंटन यांची घोडदौड सुरूच

अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या पहिल्या टप्प्यातच रिपब्लिकन पार्टीचे डोनल्ड ट्रंप यांना पराभव स्वीकारावा लागला. टेक्सासचे सीनेटर टेड क्रूज यांनी त्यांना मात दिलीय. 

Updated: Feb 2, 2016, 04:36 PM IST
आयोवात 'ट्रंप कार्ड' पडलं मागे, क्लिंटन यांची घोडदौड सुरूच  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या पहिल्या टप्प्यातच रिपब्लिकन पार्टीचे डोनल्ड ट्रंप यांना पराभव स्वीकारावा लागला. टेक्सासचे सीनेटर टेड क्रूज यांनी त्यांना मात दिलीय. 

तर दुसरीकडे डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांनी आपले प्रतिस्पर्धी वेरमांटचे सीनेटर बर्नी सँडर्स यांच्यावर मात केलीय.  

आयोवा कॉकसचे निकाल घोषित झाल्यानंतर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार बनण्यासाठी मुख्य रुपात तीन दावेदारांमध्ये मुकाबला होईल, असं वाटत होतं. आयोवामध्ये क्रूज आणि ट्रंप यांच्यानंतर मार्को रुबियो यांनी तगडी झुंज देत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. 

५५०० मतांनी ट्रंप पडले मागे

जवळपास सगळ्या मतांची मोजणी केल्यानंतर क्रूज यांना २८ टक्के मिळाले होते तर ट्रंप यांना २४ टक्के... क्रूज याना ट्रंप यांच्यापेक्षा तब्बल ५५०० हून अधिक मतं मिळाले. रुबियो हे २३ टक्के मतांसहीत तिसर्या स्थानावर आहेत. 

मूळ न्यूरो सर्जन असलेले राजनेते बेन कार्ल्सन चौथ्या स्थानावर राहिले त्यांना ९ टक्के मतं मिळाली. 

माजी परदेश मंत्री राहिलेल्या हिलरी क्लिंटन आणि सँडर्स यांच्यात तगडा मुकाबला पाहायला मिळाला. दोघांनीही जवळपास ५०-५० टक्के मतं पटकावली. पण, काहीशा मतांच्या फरकानं सँडर्स मागे पडले.