www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
‘शतकातील धूमकेतू’ असं ज्याचं वर्णन करण्यात आलंय, अशा ‘इसॉन’ या धूमकेतूनं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केलाय. त्यामुळं आता जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलंय ते आकाशात होणाऱ्या ‘आतषबाजी` कडे.
ही आतषबाजी आपल्याला उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांत या धूमकेतूच्या पोटातील वायूंचा मोठा स्फोट झाल्यानं तो अधिकच स्पष्ट दिसू लागला असून, तो आता सूर्याच्या दिशेनं झेपावला आहे. ‘इसॉन’सूर्याच्या अगदी जवळ पोचेल तेव्हा तो आपल्याला चंद्रापेक्षाही उजळ दिसणार आहे.
‘इसॉन’चा शोध गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रशियाच्या दोन खगोलशास्त्रज्ञांनी लावला आणि त्या वेळी तो सूर्यापासून ५८ कोटी ५० लाख मैल अंतरावर होता. बर्फ आणि धूलिकणांपासून बनलेला हा धूमकेतू ३७७ किलोमीटर प्रतिसेकंद वेगानं सूर्याच्या दिशेनं जात आहे.
२८ नोव्हेंबरला ‘इसॉन’ सूर्याच्या अगदी जवळ पोचेल आणि तेव्हा त्याचं तापमान २ हजार ७६० अंश सेल्सिअस असेल. या धूमकेतूची शेपटी १६८०मध्ये दिसलेल्या धूमकेतूप्रमाणंच ९ कोटी किलोमीटर लांबीची असेल आणि धूमकेतू दिवसा उजेडातही स्पष्ट दिसेल. सूर्याजवळ गेल्यानंतर तो नष्ट होण्याची शक्य ता आह. मात्र तो मृत्यूचा सोहळा नेत्रदीपक असेल. इसॉननं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानं यापुढं घडणारी कोणतीही घटना अभ्यासासाठी उपयुक्तच आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.