भारतीय कार्यक्रम दाखवल्यानं पाकिस्तानी चॅनेलला १ कोटी रु. दंड

पाकिस्ताननं त्याचा मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवलाय. पाकिस्तानातील दहा चॅनेल्सना भारतीय आणि परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळानं या वाहिन्यांना पत्रं पाठवून दंड भरण्यास सांगितलंय. शिवाय यापुढं भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 19, 2013, 12:43 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लाहोर
पाकिस्ताननं त्याचा मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवलाय. पाकिस्तानातील दहा चॅनेल्सना भारतीय आणि परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळानं या वाहिन्यांना पत्रं पाठवून दंड भरण्यास सांगितलंय. शिवाय यापुढं भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.
माहिती प्रसारण आणि राष्ट्रीय वारसा खात्याच्या (पेमरा) काही नियमावलींचा आधार घेऊन हा दंड आकारण्यात आल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलंय. पाकिस्तानात रोज प्रमाणाबाहेर भारतीय आणि परकीय भाषांतील कार्यक्रम दाखवले जातात. रोज कोणत्या चॅनेलवर कोणते कार्यक्रम आणि जाहिरात दाखवल्या जातात यावर पेमराच्या देखरेख प्रणालीनुसार लक्ष ठेवलं जातं. खासगी पाकिस्तानी चॅनेल्सना १० टक्के परदेशी कार्यक्रम दाखवण्याची परवानगी आहे. त्या १० टक्क्य़ातील ६० टक्के भारतीय किंवा इतर भाषातील तसंच १० टक्के इंग्रजीतील कार्यक्रम दाखवण्यास अनुमती आहे.
पाकिस्तानमध्ये दंड करण्यात आलेल्या वाहिन्यात हम टीव्ही, ऑक्सिजन टीव्ही, प्ले टीव्ही, कोहिनूर एंटरटेनमेंट, एनटीव्ही एंटरटेनमेंट, जीएक्सएम एंटरटेनमेंट, जलवा एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे. पाकिस्तानात धार्मिक द्वेषभावना भडकवण्यास कारणीभूत ठरत असलेली सोशल मीडिया संकेतस्थळे, मोबाईलधारक आणि संबंधित कंपन्यांवर कारवाईचे आदेश पाकिस्तान सरकारनं दिले आहेत.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी सांगितलं की, धार्मिक द्वेष पसरवणारा आशय प्रसारित करू नये. जी संकेतस्थळं, मोबाईलधारक असं करीत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश एफआयएला देण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यासाठीही या सेवांचा वापर होतो, असं दिसून आलंय. त्यामुळं सोशल मीडिया आणि इतर सेवांवर बंदी घातलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.