www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क
अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधले मतभेद दूर न झाल्यान अखेर १७ वर्षानंतर अमेरिकेत शट डाऊन करण्यात आलं आहे.
आपलं आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च जसं असतं. त्यानुसार ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्पाला मंजुरी आवश्यक असते. तशीच अमेरिकेत ३० सप्टेंबरपर्यंत आवश्यक असते. आपलं बजेट अमेरिकेला ३० सप्टेंबरपर्यंत मंजुर करणं आवश्यक असतं. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्त्वाकांशी आरोग्य देखभाल विधयकाला सीनेटची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळं अमेरिकेवर हे संकट ओढवलंय. शट डाऊनमध्ये अनावश्यक सरकारी खाती बंद केली जातात. जवळपास ८ लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. या दरम्यान त्यांना कोणताही पगार दिला जात नाही. तसंच बजेटच मंजुर न झाल्यानं, खर्चावर आपोआपच मर्यादा येतात.
ओबामा यांनी विरोधकांना मतभेद दूर करून अर्थसंकल्प मंजुरीचं आवाहन केलं होतं. पण त्याचा काहीही उपयोग न झाल्यानं अखेर व्हाईट हाऊसमधून अधिकृतरित्या शटडाऊन जाहीर करण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘हेल्थकेअर कायदा’ ज्याला ओबामा केअर असं संबोधलं जात आहे, या विधेयकामुळंच हा प्रसंग उद्भवला आहे. हे विधेयक मागे घ्या आणि यावर खर्च करू नका, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टीनं सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय.
याआधी १९९५मध्ये राष्ट्रपती बिल क्लिंटनच्या काळात २८ दिवसांसाठी शट डाऊन घेषित करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.