लंडन : जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
एकूण 650 सदस्य असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 325 जागा मिळवणारा पक्ष बहुमत मिळवून सत्तेत येईल... मुख्य लढत विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टी आणि एड मिलिबँड यांच्या लेबर पार्टी यांच्यात होणार आहे.. असं असलं तरी निकोला स्टर्जन यांच्या नेतृत्वाखालील स्कॉटिश नॅशनल पार्टी आणि नायजेल फराज यांच्या नेतृत्वाखालील युकेआयपी हे दोन पक्षसुद्धा या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत 6.2 लाख मतदार असलेल्या ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या आणि आशियाई वंशाच्या ब्रिटिश नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळंच अनेक उमेदवारांनी या मतदारांना रिझवण्याचे प्रयत्नही केलेत. काही भारतीय वंशाच्या उमेदवारांनी बॉलिवूड कलाकारांनाही पाचारण केलं होतं. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला 34 टक्के तर लेबर पार्टीला 33 टक्के मतं मिळण्याचा अंदाज बीबीसीनं वर्तवलाय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.