न्यूयॉर्क : नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे.
लाईव्ह सायन्सच्या एका अहवालानुसार, नासाची अशी योजना आहे की असे आणखी आवाज रेकॉर्ड करून यावर्षाच्या शेवटी बलून अंतळात पाठवण्याचा नासा विचार करत आहे. हे आवाज चॅपल हिल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी डेनियल बोमेनने रेकॉर्ड केले आहेत. एका वृत्तपत्राने सांगितले की, गेल्या ५० वर्षात अशा आवाजांची रेकॉर्डिंग झाली नव्हती.
बोमेनने सांगितले की, जर आपण एखादं उपकरणं पाठवू शकलो तर, अशा गोष्टींची माहिती मिळेल जी आपल्याला याआधी कधीही माहीत नसेल. हाय एल्टिट्युड स्टुडेंट प्लॅटफॉर्म अभ्यासाच भाग म्हणून बोमेनने ऑगस्टमध्ये न्यू मॅक्सिको आणि एरिजोनाच्या आकाशात एक हेलिअम बलूनसोबत इंफ्रारेड मायक्रोफोन सोडला होता. हा बलून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ७२५ किमी भागात आणि ३७,५०० मीटर उंचीपर्यंत उडत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.