न्यू यॉर्क : अमेरिकेच्या मिसौरी राज्यात एका दाम्पत्याने वयाचे बंधन तोडून लग्न केले. कॅजी बर्ग ही ५५ वर्षांची तर तिचा पती हेन्री ग्लॅडनिंग २६ वर्षांचा आहे. दोघांमध्ये सुमारे ३० वर्षांचे अंत आहे.
एका रॉन्ग नंबरवर चुकीचा एसएमएस पाठविल्यानंतर त्याचे हे नाते निर्माण झाले. २०१२मध्ये कॅजीने आपल्या सहकाऱ्याला एक एसएमएस पाठिवला, पण तो मेसेज चुकीने हेन्रीला गेला. त्यानंतर दोघांचा एकमेकांशी संबंध निर्माण झाला आणि गाठी-भेटीनंतर हे नाते लग्नापर्यंत गेले. यात दोघांचे वय मध्ये आले नाही.
कशी सुरू झाली कहाणी
जून २०१२ मध्ये कॅजी एका बिझनेस ट्रिपसाठी डेनवरमध्ये गेली होती. तिने आपल्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी एक मेसेज केला. पण तो मेसेज हेन्रीला गेला. हेन्री त्यावेळी मिसौरीत काम करीत होता. हेन्रीने याचे पॉझिटिव्ह उत्तर पाठिवले, ते कॅजीला आवडले.
काही वेळानंतर कॅजीने लिहून पाठवले की, ती वैतागली आहे कोणाशी कनेक्ट होऊ शकत नाही. पण अशा व्यक्तीशी कनेक्ट झाली आहे, जो रॉन्ग नंबर आहे. काही मेसेजनंतर दोघांची आवड-निवड, चित्रपट आणि पुस्तकांवर चर्चा झाली. हेन्रीने सांगितले की 'द सीक्रेट' पुस्तकाबद्दल माहिती असल्यास तुला लॉ ऑफ अॅक्ट्रॅक्शनच्या आयडीयावर बोलू शकतो. कॅजीने सांगितले, ती या पुस्तकासाठी वेडी आहे.
वय आड नाही आलं
कॅजीने सांगितले की आम्ही एकमेकांचे फोटो एक्सचेंज केले होते, पण हेन्रीने विचारल तुझे वय किती आहे. त्यावर कॅजीने सांगितले, माझे मन २५ वर्षांचे आहे पण वय ५३ वर्ष आहे. पण हेन्रीला त्याचा फरक नाही पडला. एक आठवड्यात ते भेटले. सहा महिन्यापूर्वी घटस्फोट झालेल्या कॅजीने ठरविले होते की कोणाशी प्रेम नाही करणार पण हेन्रीने असे होऊ दिले नाही. त्याने दोन महिन्यातच आपल्या पालकांचे घर सोडून कॅजीसोबत अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी शिफ्ट झाला. हेन्रीचे पालकांचा या संबंधांना होकार होता.
हेन्रीला मुलगा समजतात
सुरूवातीला दोघांना टेन्शन होते की, लोकांनी हेन्रीला कॅजीचा मुलगा समजू नये. पण लोकांना हळूहळू समजले. पण आजही ज्यांना माहित नाही ते हेन्रीला मुलगा समजतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.