पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार

काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

Updated: Oct 14, 2014, 03:25 PM IST
पाकला धक्का, यूनोचा काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार title=

न्यू यॉर्क: काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास यूनोनं नकार दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्ताननं केली होती. भारत आणि पाकिस्ताननं एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं आहे. 

सीमा रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्ताननं गेल्या काही दिवसांपासून काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रासमोर नेण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रामधील भाषणात काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता.

त्यानंतर शरीफ यांच्या परराष्ट्र आणि सुरक्षाविषयक सल्लागारांनी शनिवारी संयुक्त राष्ट्राला पत्र पाठवून काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या पत्रात भारतानंच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असा कांगावाही पाकिस्ताननं केला होता.
  
संयुक्त राष्ट्रानं मंगळवारी पाकिस्तानच्या पत्राचं उत्तर दिलं आहे. या पत्रात संयुक्त राष्ट्रानं काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्न रेटण्याची पाकची चाल अयशस्वी ठरल्याचं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.