www.24taas.com झी मीडिया, टोकीयो
जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.
जपानमध्ये २०११ ला झालेल्या त्सुनामीनंतर फुकुशिमा येथील आण्विक किरणोत्सारामुळे मोठे संकट आले होते. फुकुशिमामधील दाईची आण्विक प्रकल्पाचा तपास करणाऱ्या टोकीयो वीजनिर्मिती केंद्राने सांगितले की, साठवणी गृहामध्ये गेल्या आठवड्यात सुमारे ३०० टन किरणोत्सारी पाण्याची गळती झाली आहे. ही गळती अतिशय गंभीर असल्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ही गळती धोकादायक असल्याचे सांगितले जाते.
२०११ फुकुशिमामधील तीन अणुभट्ट्या वितळल्याने ‘लेव्हल ७’ चा इशारा दिला गेला होता आणि आता किरणोत्सारी पाण्याच्या गळतीनंतर आण्विक संस्थेने ‘लेव्हल ३’ चा इशारा दिला आहे. फुकुशिमानंतर आता भारतातही अणुवीज कंपन्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.