www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियावर हल्ला करण्याचा मूड आता बदललाय. सीरिया सरकारनं २१ ऑगस्ट रोजी आपल्याच जनतेवर केलेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा परिणाम म्हणून दमिश्कवर हल्ला करण्याबद्दल आपण आत्तापर्यंत काहीही निर्णय घेतला नसल्याचं ओबामा यांनी म्हटलंय.
‘पीबीएस न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी हे वक्तव्य केलंय. ‘आम्ही आत्तापर्यंत हल्ल्याविषयी काहीही निर्णय घेतलेला नाही. परंतु रासायनिक हत्यांरांच्या वापराविरुद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन व्हायलाच हवं... सीरियामध्ये सरकारनं नागरिकांविरुद्ध रासायनिक हत्यारांचा वापर केलाय आणि यात दुमत असायला नको’ असं त्यांनी म्हटलंय. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना ओबामा म्हणतात, ‘आम्ही अनेक पुरावे पडताळून पाहिलं आणि त्यामुळेच विरोधी पक्षाकडे कोणतीही अणूशक्ती किंवा रासायनिक हत्यारं आहेत, यावर आमचा विश्वास नाही’
‘विरोधी पक्ष रासायनिक हल्ला करू शकतो यावर माझा विश्वास नाही. सीरिया सरकारनंच हा हल्ला केलाय असा निष्कर्षावर आम्ही आता पोहचलोय... आणि हे जर खरं असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील’ असं त्यांनी म्हटलंय.
याच दरम्यान सीरियात सैन्य हस्तक्षेपासंबंधी विचारलं असता या मुद्द्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमध्ये नेण्याची काहीही आवश्यकता नाही, असं अमेरिकेनं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.