जगातील टॉप ५ मोस्ट वॉन्टेड अपराधी

जगात दशहद माजवणारे अनेक अपराधी आहेत. जे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाऊद इब्राहिम जसा भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. तसेच या जगात अनेक मोठे आरोपी आहेत. ज्यांच्यावर तेथील सरकारने पकडून दिल्यास मोठे बक्षीस ठेवले आहे.

Updated: Jan 10, 2016, 10:36 PM IST
जगातील टॉप ५ मोस्ट वॉन्टेड अपराधी title=

मुंबई : जगात दशहद माजवणारे अनेक अपराधी आहेत. जे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाऊद इब्राहिम जसा भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. तसेच या जगात अनेक मोठे आरोपी आहेत. ज्यांच्यावर तेथील सरकारने पकडून दिल्यास मोठे बक्षीस ठेवले आहे.

१. डोकू उमराव : डोकू म्हणजेच ओसामा बीन लादेन. हा २०११ मधील मोस्ट वॉन्टेड सुची मध्ये पहिल्या स्थानकावर होता. लादेनला दक्षिण रशियाला इस्लामिक स्टेट करायचं होते.
लादेनवर ३३ कोटींचं बक्षीस होतं.

२. जॉक्विन गूजमॅन : मेक्सिकोच्या जेलमधून दीड मैल एवढी भुयार खोदून हा जेलमधून पळून गेला. ड्रग्सची तस्करी करण्याच्या आरोपात त्याला अटक झाली होती. ६ महिन्यांनंतर हा पुन्हा पोलिसांच्या हाती लागला. अमेरिकेने याच्यावर ३३ करोड ४४ लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.

३. अयमान अल जवाहिरी : तालिबानी नेता अयमान जगातील तिसरा मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. केनिया येथील अमेरिका दुतावासावर बॉम्बस्फोट करुन याने शेकडो लोकांचा जीव घेतला होता. 

४. दाऊद इब्राहिम : दाऊद हा जगातील चौथा मोस्ट वॉन्टेड आरोपीच्या यादीत आहे. १९९३ मधील मुंबईतील सिरीयल बॉम्बस्फोटातील दाऊद हा आरोपी आहे. दाऊदच्या कंपनीत ५ हजार लोक सलग्न असल्याची माहिती फोर्ब्सने दिली होती. दाऊदला पकडून देणाऱ्यास १६७ कोटी रुपये भारत सरकारने घोषित केले आहे.

५. सेमिअन मोगिलेवीच : रशियामधील हा मोठा आरोपी आहे. याच्यावर टॅक्स चोरी केल्याचा आरोप आहे. सेमिअनवर १५० मिलियन डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अमेरिकेत हत्यारांची तस्करी करण्याचा याच्यावर आरोप आहे.