टाइम पर्सन ऑफ द इअर'च्या रेसमध्ये ट्रम्पने केला मोदींचा पराभव

  अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची  टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होते. पंतप्रधान मोदी जनतेने केलेल्या मतदानात जिंकले होते. पण एडिटर्स रँकिंगमध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली. 

Updated: Dec 7, 2016, 07:30 PM IST
 टाइम पर्सन ऑफ द इअर'च्या रेसमध्ये ट्रम्पने केला मोदींचा पराभव  title=

न्यू यॉर्क :   अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची  टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होते. पंतप्रधान मोदी जनतेने केलेल्या मतदानात जिंकले होते. पण एडिटर्स रँकिंगमध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली. 

रिडर्स पोलमध्ये पीएम मोदी सर्वाधिक १८ टक्के मतांनी आघाडीवर होते. रिडर्स ऑनलाइनमध्ये मोदींचा हा दुसरा विजय होता. पंतप्रधान मोदी या रेसमध्ये चौथ्यांदा सामील झाले होते. 

यापूर्वी १९३० मध्ये टाइम पर्सन ऑफ द इअर खिताब जिंकणारे महात्मा गांधी हे एकमेव भारतीय आहे.