नवी दिल्ली : सर्वात टेक सॅव्ही राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखल्या गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे एक स्पेशल ब्लॅकबेरी वापरतात... हे फारच कमी लोकांना माहीत असेल... चला तर पाहुयात काय स्पेशल आहे या स्पेशल ब्लॅकबेरीमध्ये...
- जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीच्या मोबाईलच्या सुरक्षेसाठी केवळ पासवर्ड नाही... तर या फोनमध्ये अमॅच्युअर आणि प्रोफेशनल हॅकसी, गुप्तहेर संघटना यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठीच्या आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत.
- ओबामा मागील एक दशकांहून जास्त काळ ब्लॅकबेरी वापरत आहेत. परंतु, २००८ मध्ये राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांना काही काळ 'सेक्टेरा एज' फोन वापरावा लागला. हा फोन नॅशनल सिक्युरिटी एजन्सीनं खास राष्ट्रध्यक्षांसाठी डिझाईन केला होता. परंतु, ओबामा ब्लॅकबेरी वापरतात म्हणून फारच कमी काळात त्यांच्यासाठी एका सुरक्षित ब्लॅकबेरीची सुविधा पुरवण्यात आली. यामध्ये, 'सिक्युअरवाईस' नावाचं स्पेशल सिक्युरिटी सॉफ्टवेअर इनस्टॉल करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीनंच हादेखील ब्लॅकबेरी तयार केलाय.
- नव्या ब्लॅकबेरीमधून सगळे इनबिल्ट फिचर्स हटवण्यात आले त्यामुळे कोणताही हॅकर या फोनपर्यंत सहजासहजी पोहचू शकत नाही. या फोनमध्ये कोणताही गेम नाही, सेल्फी कॅमेरा किंवा टेक्स्ट मॅसेज करण्याचं कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परंतु, यामध्ये टॉप लेव्हलचे सिक्रेट मॅसेज डिकोड करण्याचे सगळे फिचर्स उपलब्ध आहेत.
- या फोनमधून केवळ १० नंबरवर कॉल केला जाऊ शकतो. हे १० फोनदेखील त्याच पद्धतीचे एनक्रिप्शनचा वापर करतात. यामध्ये उपराष्ट्रपती जो बिडन, ओबामा यांचे चीफ ऑफ स्टाफ, काही सल्लागार, प्रेस सेक्रेटरी, फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि आणखी काही कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींचा ब्लॅकबेरी केवळ एकाच सिक्युअर बेस स्टेशनशी कनेक्ट होऊ शकतो. ज्यामुळे, या डिव्हाईसचा 'आयएमईआय' नंबर गुप्त ठेवण्यात येतो त्यामुळेच हा नंबरचं ट्रॅकिंग केवळ अशक्य आहे.
- राष्ट्राध्यक्षांसाठी लिमोजिन आणि एअर फोर्स वनमध्येही एक सिक्युअर बेस स्टेशन असणं आवश्यक होतं. हे सिक्युअर बेस स्टेशन वॉशिंग्टनच्या एका सिक्युअर सॅटलाईट लिंकशी कनेक्टेड आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.