नवी दिल्ली : या जगावर कुणाची सत्ता आहे? निम्म जग कुणाच्या मालकीचं आहे? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. जगातली श्रीमंत आणि गरीब ही दरी अधिकाधिक रुंद होत असून सर्वाधिक श्रीमंत अशा निव्वळ एक टक्का लोकांकडे जगाची निम्मी संपत्ती २०१६ पर्यंत एकवटणार आहे.
गरीबी हटविण्यासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम या स्वयंसेवी संस्थेनं याबाबतची आकडेवारी जाहीर केलीय. या आठवड्यात संस्थेची वार्षिक सभा स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं होतेय. त्यानिमित्त ही आकडेवारी जाहीर झालीय. क्रेडिट सुईस वेल्थ डेटाबँक, फोर्ब्ज बिलियनरीज लिस्ट यांचा आधार घेऊन ऑक्सफेमनं ही आकडेवारी तयार केलीय.
'ऑक्सफेम'च्या म्हणण्यानुसार जर अर्थव्यवस्थेचा विकास दर समान राहिला तर २०१५ मध्ये सगळ्यात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ५० टक्के वाढ दिसून येऊ शकते. ऑक्समनच्या म्हणण्यानुसार, जगभरातील एकूण संपत्तीच्या ५२ टक्के संपत्तीच्या ४६ टक्के संपत्तीचे मालक केवळ पाच व्यक्ती आहेत. जगभरातील उरलेल्या जनसंख्येच्या वाट्याला जगभरातील संपत्तीच्या केवळ ५.५ टक्के संपत्ती येतेय.
'ऑक्सफेम'ची भूमिका काय म्हणतात विनी विनियिमा ?
याबाबत ऑक्सफॅमच्या कार्यकारी संचालिका विनी विनियिमा यांनी २०१६ पर्यंत केवळ एक टक्के लोकांकडे उरलेल्या सर्व जगापेक्षा जास्त संपत्ती असेल. अशा जगामध्ये राहायची आपली इच्छा आहे का? गरीबी निर्मुलनात आलेल्या अपयशानं आपला लढा काही दशकं मागे नेलाय. वाढत्या असमतोलाचा गरीबांना दुप्पट फटका बसतोय. त्यांच्या वाट्याला येणारा विकास सातत्यानं कमी आणि कमीच होत जाताना दिसतोय, असं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.