नवी दिल्ली : सर्वसाधारण सेक्स आरोग्यासाठी चांगला असतो, असे मानले जाते. मात्र, सेक्स करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे.
डेली मेलने याबाबत एक वृत्त दिले आहे. लुसीचा पती मार्कचा अशाच एका घटनेत मृत्यू झाला. मात्र, यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. लुसीने एका प्रकाशित झालेल्या पुस्तकात पतीला मुकलो असल्याचा खुलासा केला आहे.
लुसीच्या म्हणण्यानुसार मार्कला दुसरे बाळ हवे होते. यासाठी तो सेक्स करीत होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. धक्कादायक म्हणजे मार्कने सेक्यच्यावेळी प्राण सोडले.
लुसीने सांगितले, मार्क आणि माझ्यामध्ये अनेक दिवसांपासून संबंध नव्हते. ज्यावेळी आम्ही अनेक दिवसानंतर एकत्र आल्याने मार्कच्या हृदयाचे ठोके अधिक वाढलेत. मार्कला ते सहन झाले नाही.
दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले, मार्क अरिथिमिया नावाच्या आजाराने त्रस्त होता. या आजारामुळे त्याच्या हृदयाचे ठोके वाढत असत. त्यामुळे त्याला हृदय विकाराचा झटका आल्याची शक्यता आहे. हा आजार ३० ते ४५ वयोगटातील पुरुषांना जास्त करुन बळावतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.