बीजिंग: चीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज डॉलरच्या जेवणाची नासाडी केली जाते. जवळपास २० कोटी लोकांचं पोट या भोजनावर भरू शकतं. या व्यतिरिक्त दरवर्षी ३५ किलो अन्न भंडारगृह आणि वाहतुकीच्या वेळी वाया जातं.
चीनच्या अन्न विभाग प्रशासनाचे उप निर्देशक वू जिदाननं यांनी सांगितले की, अत्याधिक भोजनाचा खप वाढल्यामुळं याचा प्रभाव पाणी आणि कृषि संसाधनवर पडत असल्याचं निदर्शनास आलंय. चीनमध्ये दरवर्षी जवळपास २०० अब्ज युआनचं जेवण टेबलवर सोडलेलं जेवण असतं.
एका शैक्षणिक कार्यक्रमामध्ये बोलतांना त्यांनी सांगितले की, ही जेवणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
चीनची ही परिस्थिती आहे तर भारतातही काही वेगळी परिस्थिती नसेल. भारतामध्येही खूप अन्न हॉटेल्स, लग्न आणि घरी वाया जात असतं. तेव्हा सर्वांनीच अन्न वाया जावू नये, याची खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर चीनच्या पंक्तित आपणही जावून बसू...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.