www.24taas.com,नवी दिल्ली
भारतीय सैनिकांच्या निर्घृण हत्तेबाबत लष्करप्रमुख विक्रम सिंग यांनी पाकस्तानवर जोरदार हल्ला चढवलाय. पाकिस्तानचा हल्ला हा पूर्वनियोजितच असल्याचं लष्करप्रमुखांनी पाकला ठणकावून लांगितलंय.
पाकिस्ताननं भारतीय सैनिकांबाबत केलेलं कृत्य सहनशिलतेच्या पलिकडचे असून ते माफिलायक नसल्याचं लष्करप्रमुखांनी स्पष्ट केलंय. यापुढे शस्त्रसंधीचे उल्लंघन करून चिथावल्यास आक्रमक उत्तर देण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा विक्रम सिंह यांनी पाकिस्तानला दिलाय.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान ब्रिगेडीयर पातळीवर आज ध्वज बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही बैठक झालीये. प्रत्यक्ष ताबारेषेजवळील पुंछच्या चाकन- दा-बघ या ठिकाणी ही बैठक पार पडली. ८ जानेवारीला पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांची क्रूरपणे हत्या केली होती.
भारतीय सैनिकांची शीर सुद्धा पळवण्यात आलीयेत. भारताकडून याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे दोन्ही गटाच्या अधिका-यांमध्ये चर्चा झाली. भारताकडून ब्रिगेडियर तेजपाल संधू यांनी भारतातर्फे मतं मांडली.
हेमराज कुटुंबीयांचं उपोषण
लष्करप्रमुख विक्रमसिंग उपोषणकर्त्या हेमराजच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. लष्करप्रमुख भेटायला आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शहीद हेमराज यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. पाकिस्तानी सैन्याकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या शहीद हेमराज यांचे कुटुंबीय उपोषणाला बसलेत.
त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. शहीद जवानाचे शिर परत आणून द्यावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. उपोषणाला बसलेल्या शहीद पत्नीची तब्येत खालावलेली आहे. उपोषणामुळं कमजोरी आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलयं.
डॉक्टरांचं एक पथक उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवून आहेत. उपोषणकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल असं डॉक्टरांनी म्हटलयं. तर शहीद हेमराजच्या कुटुंबीयांकडून सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येतोय.