मुंबई : किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन याचा मून वॉक आणि गुरुत्वाकर्षण विरोधी शूज या डान्स स्टेप खूप प्रसिद्ध आहे. यातील अँटी ग्रॅव्हिटी मूव्हचे रहस्य उघड झाले आहे.
या मूव्हचे रहस्य अनेक दिवस त्याच्या चाहत्यांना होते. १९८७ मध्ये मायकल जॅक्सनचा अल्बम ‘स्मूथ क्रिमिनल’ मध्ये ही अँटी ग्रॅव्हिटी मूव्ह आपण पाहिली होती. यातील तो उभा राहून पुढे जमिनीकडे वाकायचा. त्याचे पाय सरळ असायचे., पण तो ४५ अंशाच्या कोनात वाकायचा, पण तो पडायचा नाही. गुरूत्वाकर्षणाला चॅलेंज देणारी ही त्याची मूव्ह होती. हे कसे शक्य होते या बाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती.
तर, ही मूव्ह मायकल जॅक्सन याने एका खास शूजच्या मदतीने केली होती. स्टेजला खिळा रोवला होता. तसेच शूजला एक वेगळ्या प्रकारची खाच तयार करण्यात आली होती. ती स्टेजच्या खिळ्यात अडकवून मायकल जॅक्सन समोरच्या दिशेने आपले शरीर झोकून द्यायचा. पण तो जमीनीवर आदळत नसे. तो अलगद वरही यायचा. तर वाचण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.