वेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा!

जगभराच्या काना-कोपऱ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयार आहेत. गेल्या वर्षापर्यंत मोबाईलवर मॅसेजच्या रुपात येणाऱ्या शुभेच्छा यंदा व्हॉटसअपवरून येणं सुरू झालंय. 

Updated: Dec 31, 2014, 10:08 PM IST
वेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा! title=

नवी दिल्ली : जगभराच्या काना-कोपऱ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयार आहेत. गेल्या वर्षापर्यंत मोबाईलवर मॅसेजच्या रुपात येणाऱ्या शुभेच्छा यंदा व्हॉटसअपवरून येणं सुरू झालंय. 

न्यूझीलंडच्या ऑकलंडच्या स्काय टॉवरवरून आतिषबाजी करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. लोकांनी एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. तर ऑस्ट्रेलियात सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये हार्बर ब्रिज आतिषबाजीनं झगमगून निघालं. 

सोबतच, राजधानी दिल्लीतही नवीन वर्षाच्या स्वागताची धूम जोरात आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पब, रेस्टॉरंट, बाजार, मॉल आणि इतर लोकप्रिय स्थळांना खूप सजवलं गेलंय. 

कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी ठिकठिकाणी तैनात असलेले पोलीस दिसून येत आहेत. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय. बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा यंत्रणा सज्ज झालीय. प्रतिष्ठीत हॉटेलांबाहेरही विशेष टीम तैनात करण्यात आलेल्या दिसून येत आहेत.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.