कराची : आम्ही पाकिस्तानात आनंदात आहोत. मुंबईत मुसलमानांना त्रास देऊ नका, असा प्रेमाचा सल्ला दिलाय कराचीतल्या मराठी कुटुंबियांनी शिवसेनेला दिलाय.
'झी मीडिया'चं सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'नं कराचीतल्या मराठी कुटुंबियांशी साधलेल्या संवादात या कुटुंबांनी हा सल्ला शिवसेनेला दिलाय. कराचीत सध्या साधारण १०० मराठी कुटुंब आहेत. त्यापैकीच काहींशी डीएनएच्या प्रतिनिधींनी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी आम्ही इकडे सुखासमाधानात राहत असताना, तिकडे पाकिस्तानी लोकांना अशी वागणूक का मिळते, असा सवाल श्री महाराष्ट्र पंचायत कराचीचे सदस्य विशाल राजपूत यांनी उपस्थित केलाय.
आम्ही मूळचे महाराष्ट्रीय आहोत, हिंदू आहोत आणि पाकिस्तानचे नागरिक आहोत. आम्ही अशी आशा करतो, मुंबईतल्या घटनांचे आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत. उद्या जर आम्हाला मुंबईत येण्याची वेळ आली, तर आम्हाला प्रवेश नाकारण्यात येणार नाही, असा आशावादही विशाल रजपूत यांनी व्यक्त केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.