नवी दिल्ली : प्रेमाची अशीही हृदयद्रावक कहानी असू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, ही बातमी वाचल्यानंतर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच दृढ होईल.
एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणलाय. थायलंडमधल्या फॅनॉम सराखाम इथं ही घटना घडलीय.
थाई कायद्यात हा विवाह बसत नसला तरी नान थिप्परात या महिलेनं आपल्या प्रियकराच्या अंत्यविधीच्या वेळी त्याच्याशी विवाह केलाय. फियाट याचा हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं होतं. त्यानंतर तिनं आपल्या या विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल वेबसाईटवरही शेअर केलेत.
'आम्ही एकत्र आमच्या विवाहाचं स्वप्न पाहिलं होतं. रेस्ट इन पिस, आय लव्ह यू, फियाट. आमचं स्वप्न सत्यात उतरलंय' असं तिनं या फोटोसहीत म्हटलंय. या विवाहाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होताना दिसतोय.