जोडीदाराच्या शोधासाठी अजब गजब जाहिरात

आपल्या आयुष्यातील जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रिमोनीसारखे पर्याय निवडले जातात. मात्र थायलंडमधील एका टीव्ही अभिनेत्रीने जीवनसाथी शोधण्यासाठी एक अजबगजब जाहिरात दिलीये. 

Updated: Apr 5, 2016, 12:03 PM IST
जोडीदाराच्या शोधासाठी अजब गजब जाहिरात title=

बँकॉक : आपल्या आयुष्यातील जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रिमोनीसारखे पर्याय निवडले जातात. मात्र थायलंडमधील एका टीव्ही अभिनेत्रीने जीवनसाथी शोधण्यासाठी एक अजबगजब जाहिरात दिलीये. 

अरण्या पुई पाथुमाथॉन्ग असे या अभिनेत्रीचे नाव आहे. सध्या तिचा जाहिरातीतील फोटो सोशल मीडियावर फिरतोय. या जाहिरातीत तिचा बोल्ड पोस्टर असून त्याखील तिने स्वत:चा मोबाईल नंबरही दिलाय. 

त्या पोस्टरमध्ये तिने आपण व्हर्जिन असून एका अशा जोडीदाराच्या शोधात आहोत ज्याच्यामुळे तिच्या जीवनातील एकटेपणा संपेल. थाय भाषेत हे लिहिण्यात आले आहे. 

दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते पोस्टर काढून टाकण्यात आले असून जाहिरात संस्थेला ५०० बाथचा दंड ठोठावलाय.