पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.

Reuters | Updated: Nov 14, 2015, 10:12 AM IST
पॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा title=

पॅरिस : फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.

पाहा हा व्हिडिओ

अधिक वाचा : फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला 

फ्रान्समध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ७ ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. फूटबॉल स्टेडिअमच्या जवळ तीन शक्तिसाली स्फोट घडवून आणण्यात आलेत. या हल्ल्यात आतापर्यंत १५८ हून अधिक जण ठार झाल्याची माहिती पुढे येतेय. दहशतवाद्यांनी बाटाक्लान कंसर्ट हॉलमध्ये १००जणांना ओलीस ठेवलं असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

दहशतवाद्यांनी फुटबॉल स्टेडीयम, रेस्टोरंट अशा सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलंय. ज्या स्टेडियमच्या बाहेर तीन स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला. स्टेडिअममध्ये जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान फुटबॉलची मॅच सुरु होती. आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद हे देखील त्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ५ दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. 

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निंदा केली आहे. ट्विट करुन नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही फ्रान्ससोबत असल्याचे मोदीनी म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.