तालिबानला उपरती, मलालाची सहानभूती

एक मुल (विद्यार्थी), एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामाध्यमातून (शिक्षणातून) जग बदलण्याची ताकद निर्माण होते, असा संदेश देणारी १६ वर्षीय मलाला युसुफजई हीला ताबिलाने साथ घातली आहे. तू पाकिस्तानात परत ये आणि येथील मदरशात प्रवेश घे. तेथे तू शिकव आणि तुझी लेखणी इस्लामसाठी वापर, असा सल्ला तालिबानच्या एका नेत्याने दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 18, 2013, 11:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
एक मुल (विद्यार्थी), एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामाध्यमातून (शिक्षणातून) जग बदलण्याची ताकद निर्माण होते, असा संदेश देणारी १६ वर्षीय मलाला युसुफजई हीला ताबिलाने एका पत्राद्वारे साथ घातली आहे. तू पाकिस्तानात परत ये आणि येथील मदरशात प्रवेश घे. तेथे तू शिकव आणि तुझी लेखणी इस्लामसाठी वापर, असा सल्ला तालिबानच्या एका नेत्याने दिलाय.
मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणारी मलाला. मलाला हिने मुलीच्या शिक्षणा प्रसार आणि प्रचार केल्याने तालिबान नेत्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. तिच्या डोक्याला गोळ्या लागल्या. त्यातून ती वाचली. आता ती पाकिस्तान सोडून परदेशात राहत आहे. महिला दिन आता तो मलाला दिन साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघात मलाला हिने प्रभावी भाषण केलं. तिने शिक्षणामुळे काय क्रांती होऊ शकते, हे आपल्या छोट्याषा भाषणातून प्रभावात्मकरित्या दाखवून दिले. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मलालाने मुलींच्या शिक्षणहक्कासाठी आपण यापुढे लढत राहणार आणि आवाज उठवणार असे स्पष्ट केलेय. विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. याच मलालाची आठवण तालिबानला आली आहे. तालिबानने तिला पाकिस्तानात परतण्याचे आवाहन केले आहे. मलालाने पाकिस्तानच्या दुर्गम वायव्य भागात येऊन मदरशात प्रवेश घ्यावा, असे तालिबानने म्हटले आहे.

माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना हवा असलेला तालिबानी दहशतवादी अदनान रशीद याने मलाला युसुफजईला पत्र लिहिले आहे. ‘तू घरी परत यावेस. इस्लामी आणि पश्तुलन संस्कृतीचा स्वीकार करावा आणि तुझ्या गावाजळील मुलींसाठीच्या कोणत्याही मदरशात प्रवेश घ्यावा. तुझी लेखणी इस्लामसाठी वापरावी. उच्चभ्रू वर्गाच्या संपूर्ण मानवतेला गुलामीत ढकण्याचा; तसेच नव्या जगाच्या नावाखाली आपले राक्षसी अजेंडे रेटण्याचा कट उधळून लावावा, असा सल्ला रशीदने या पत्रात मलालाला दिला आहे.
हे पत्र कोठून पाठविण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. परंतु हे पत्र माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आले. हवाई दलात काम केलेल्या रशीदने तालिबानने मलालावर केलेल्या हल्ल्याचेही या पत्रात समर्थन केले आहे. तालिबान आणि मुजाहिदीन हे कोणताही पुरुष, महिला किंवा मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात नाहीत, हे ध्यानात ठेव. मात्र, तू तालिबानविरुद्ध जाणीपूर्वक लिखाण होते. तुझे लिखाण प्रक्षोक्षक होते, असे रशीद याचे या पत्रात म्हणणे आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.