एका झटक्यात बनला सर्वांत श्रीमंत व्यक्ती!

अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 18, 2013, 03:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,
अमेरिकेचा एक नागरिकाच्या खात्यात एका झटक्यात ५४७ करोड अरब रुपये जमा झाले आणि कोणतेही परिश्रम न घेता ही व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली...
‘ऑनलाईन’ पैसे ट्रान्सफर सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ही अजब गोष्ट अमेरिकेत घडलीय. पण, ही चूक कर्मचाऱ्याच्या ध्यानात आल्यानंतर त्यानं ताबडतोब आपली चूक सुधारली.

झालं असं की, क्रिस रेनॉल्ड्स् हा ५६ वर्षीय व्यक्ती डेलावेअर इथं राहतो. एका महिन्याभराची त्याची कष्टानं मिळवलेली कमाई जास्तीत जास्त १०० डॉलरपर्यंत (जवळजवळ ५,९३४ रुपये) पोहचते. पण, ऑनलाईन पे-कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे त्याच्या खात्यात एका मिनिटात जवळजवळ ९.२२ अरब करोड डॉलर (५४७.११ अरब करोड रुपये) ट्रान्सफर झाले होते. त्यामुळे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता... तोही एका झटक्यात... पण, थोड्या वेळाकरताच...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.