सुषमा स्वराज बनल्या जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेत्या

ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील १० मोठ्या नेत्यांच्या यादीत आहे.

Updated: Jun 4, 2016, 11:17 PM IST
सुषमा स्वराज बनल्या जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेत्या title=

नवी दिल्ली : ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील १० मोठ्या नेत्यांच्या यादीत आहे. यामध्ये आता पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं नाव देखील समाविष्ट झालं आहे. ग्लोबल ट्विटरच्या वार्षिक अहवालानुसार याबाबतचा खुलासा केला आहे.

पंतप्रधान मोदी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना ट्विटरवर २ कोटी लोकं फॉलो करतात. पंतप्रधान कार्यालय पीएमओला १.१ कोटी फॉलोअर्स आहेत. ग्लोबल कम्यूनिकेशन्स फर्म बुर्सन-मार्सटेलरने केलेल्या अभ्यासानुसार सुषमा स्वराज जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला ठरल्या आहेत. त्यांना ५० लाख लोकं फॉलो करतात. त्या सध्या या यादीत १०व्या स्थानावर आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा डिजिटल वर्ल्ड मध्ये ७.५ कोटी फॉलोअर्ससह जगात पहिल्या स्थानावर आहे. फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणइ गूगल+ मध्ये ही ते पहिल्या स्थानावर आहे.