सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Updated: Aug 8, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

सूर्याचे चुंबकीय क्षेत्र दर ११ वर्षांनी आपला ध्रूव बदलत असते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात बदल होत असल्याने प्रत्येक वेळेस सौर चक्रात असे बदल होत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे सोलर फिजिसिस्ट टॉड हॉकसेमा यांनी असे सांगितले की, हा बदल पूर्णपणे सूर्यमालेवर परिणाम करत असतो.
१९७६ पासून सूर्यमालेत होणाऱ्या ध्रुवीय चुंबकीय नावाचा बदल होत आहे, या बदलावर लक्ष ठेवणाऱ्या एका मॅग्नेटोग्रामने अशा तीन घटना पाहिलेल्या आहेत आणि चौथी काही महीन्यातच पुन्हा होणार आहे. सूर्याचा चुंबकीय प्रभाव हा प्लूटोच्या पलिकडेही कोट्यावधी अंतरापर्यत प्रभाव करीत असतो. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात होणारा बदल हा एक खूप मोठा बदल आहे असं म्हटले जाते.
सूर्याची परिक्रमा करताना पृथ्वी कधी सूर्याच्या जवळ जाते तर कधी लांब असते. आता सूर्याच्या पृष्ठभागामध्ये बदल घडून आल्यास त्याचा परिणाम पृथ्वीच्या हवामानावरही होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादळ किंवा विनाशकारी घटना घडण्याची शक्यता आहे. सूर्याच्या किरणांवरही याचा परिणाम होईल. तसेच अंतराळवीर आणि अंतराळ मोहिमांवरही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पृथ्वीचे वातवरण आणि ढगांच्या यंत्रणेवरही याचा परिणाम स्पष्टपणे जाणविण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.