क्लासरूममध्ये पॉर्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल

कधी कधी माणसाला आपल्या वाईट सवयींमुळे खजील व्हावं लागतं. ऑस्ट्रेलियातील एका विद्यार्थ्यासोबतही असंच काहीसं झालं आणि त्याच्यासोबत असं काही झालं की तो बराच काळ हे विसरू शकणार नाही. 

Updated: Aug 16, 2015, 03:15 PM IST
क्लासरूममध्ये पॉर्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल  title=
सौजन्य - यू ट्यूब

सिडनी : कधी कधी माणसाला आपल्या वाईट सवयींमुळे खजील व्हावं लागतं. ऑस्ट्रेलियातील एका विद्यार्थ्यासोबतही असंच काहीसं झालं आणि त्याच्यासोबत असं काही झालं की तो बराच काळ हे विसरू शकणार नाही. 

सिडनी युनिवर्सिटी ऑफ एनएसडब्ल्यूचा एक विद्यार्थी क्लास सुरू असताना आपल्या लॅपटॉपवर पॉर्न फिल्म पाहत होता, पण तो हेडफोन लॅपटॉपशी जोडायला विसरला, असं काही झालं आहे याचं त्याला माहितच नव्हतं. 

त्याला जेव्हा समजल, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा लॅपटॉपचा आवाज संपूर्ण क्लासरूममध्ये ऐकू आला. हा आवाज अनेकांना ऐकू आला आणि  सर्व विद्यार्थी हसू लागले. 

या विद्यार्थ्याला समजले तेव्हा तो लॅपटॉप बंद करून क्लासरूमधून पळून गेला. तो पळून गेला तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजविल्या. हा सर्व प्रकार एका विद्यार्थ्याने शूट केला. आणि यूट्यूबवर अपलोड केला. या व्हिडिओला आतापर्यंत २१ लाख हिट्स मिळाले आहे. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.