वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या मुसळधार पावसानंतर ओक्लाहोमा शहर पाण्यात बुडालंय. पुरानं हाहाकार माजवलाय. हा पाऊस आणि पुरामुळं ओक्लाहोमामध्ये १५ जणांचे बळी गेलेत.
अमेरिकेतल्या टेक्सासमध्येही पुरानं हाहाकार माजवलाय. टेक्सासमध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसलंय. ब्राझोस नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं २०० घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. टेक्सासमध्ये या पावसात आतापर्यंत ६ जणांचा बळी गेला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेप्रमाणे चीनमध्येही धो-धो पावसामुळं पूरस्थिती निर्माण झालीय. चीनमधील अनेक शहरं जलमय झालीत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.
दरम्यान, कॅलिफोर्नियातील मॅनहटन बीचवर तेलाचा तवंग पसरलाय. किना-यावर दहा मीटर परिसरात तेलाचा हा तवंग पाहायला मिळतोय. या प्रकरणी तेलाचे नमुने तपासण्यात येत असून त्यानंतरच हा तवंग कुठून आला हे स्पष्ट होईल, असं अमेरिकेतील नौदलाच्या अधिका-यानं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.