लंडन : जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये रविवारी रात्री पार पडली. दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस २०१४चा 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. दरम्यान, भारताची कोयल राणा अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले.
या स्पर्धेचे हे ६४ वे वर्ष आहे. अंतिम फेरीत एकूण १२२ स्पर्धक तरुणींची निवड करण्यात आली होती. भारताच्या कोयल राणा हिची या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यामुळे भारतीयांचे लक्ष लागले होते. भारताच्यावतीने जयपूर येथील कोयल राणाने अंतिम दहामध्ये स्थान पटकावले, अंतिम पाचमध्ये ती स्थान मिळवू शकली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या २२ वर्षीय रोलेन स्ट्रॉस हिने मिस वर्ल्ड २०१४चा मुकूट आपल्या नावी केला आहे. मिस हंगरी एडिना कुलसारने दुसरे, तर अमेरिकेच्या एलिझाबेथ सेफ्रिटने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
२०१३ मध्ये मिस वर्ल्ड ठरलेल्या फिलिपिन्सच्या मेगॉन यंगने रोलेनला मिस वर्ल्डचा मुकूट चढवला. हा किताब आपल्या नावी केल्यानंतर रोलेनने म्हटले, हा किताब माझ्या देशासाठी आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे रोलेन म्हणाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.