आज जागतिक चहा दिन

  आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..

Updated: Dec 15, 2014, 07:39 PM IST
आज जागतिक चहा दिन title=

मुंबई : आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं..

चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते... जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. मुंबईकरांनीही गुलाबी थंडीत पहिल्या चहाचा अस्वाद घेण्यासाठी गर्दी केली आहे. 

अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात... पण मर्त्य मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा जिंकणारा चहाच अमृततुल्य मानून पुणेकरांनी आपली कल्पकता दाखवली... आज जागतिक चहा दिवसाच्या निमित्तानं पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव आपण चाखायलाच हवी....

कल्हई काढलेल्या चकचकीत पितळी भांड्यात आलेली उकळी... कधी एकदा हा दूग्धशर्करा योग जुळून येतो अन् पृथ्वीवरच्या अमृताचा घोट ओठात आणि ओठातून घशात उतरतो याची प्रतिक्षा... उगीच नाही, याला अमृततुल्य म्हणत... अमृताशीच ज्याची तुलना होऊ शकते असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, शरिर ताजंतवानं करतो आणि चहाच्या कपाभोवती झालेली दोस्तीही पक्की असते म्हणतात... आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणारा हा इहलोकीचा अविष्कार म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच प्रीय... म्हणूनच हा चहा पुण्याच्या संकृतीचा एक अविभाज्य भाग झालाय... 

चहासाठी पावडर कुठली आणि दूध कुठले याला इथं महत्व नाही.. हा चहा गाळण्याचा कपडा अत्युच्च गुणवत्तेचं प्रतीक आहे... चहावाल्यांच्या कित्येक पिढ्या हा अमृतयोग जुळवून आणताहेत...

चहाला अमृततुल्य मानण्याची परंपरा हा संशोधनाचा विषय असला तरी एरवी रोज बदलणा-या जगात पिढ्यान् पिढ्या टिकलेला हा चहा पुण्यनगरीचं खास वैशिट्य बनलाय... 

गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाय टी... चहाची कितीतरी रूपं... मात्र पुण्याच्या गल्लोगल्ली अस्तित्वात असलेली अमृतुल्ये आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत... या अमृततुल्य चहानंही अमृतप्राशन केलं असावं... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.