कृत्रिम स्तनांमधून कोकेनची तस्करी!

नकली ब्रेस्ट इंप्लांटमधून कोकेन लपवून नेणाऱ्या पनामाच्या एका तरुणीला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. या तरुणीकडे सुमारे दीड किलो कोकेन सापडलं आहे. याची किंमत साधारण ४२ लाख रुपये एवढी होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 13, 2012, 07:37 PM IST

www.24taas.com, बार्सेलोना
नकली ब्रेस्ट इंप्लांटमधून कोकेन लपवून नेणाऱ्या पनामाच्या एका तरुणीला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. या तरुणीकडे सुमारे दीड किलो कोकेन सापडलं आहे. याची किंमत साधारण ४२ लाख रुपये एवढी होते. या २० वर्षीय मुलीच्या स्तनांनजीक दिसत असलेल्या नाजूक कपड्यांवरून पोलिसांना तिच्याबद्दल शंका आली.
पोलिसांनी जेव्हा मुलीला या संदर्भात विचारलं, तेव्हा तिने आपण दोन महिन्यांपूर्वीच स्तनांची प्लॅस्टिक सर्जरी केल्याची बतावणी केली. मात्र त्या मुलीच्या ऑपरेशनचे व्रण ताजे असल्याचं जाणवलं. तसंच त्यामधून बराच रक्तस्त्रावही होत होता. यामुळे तरुणीची तपासणी करण्यात आली. तेव्हा या तरुणीने आपल्या नकली स्तनांखाली नाजूक वस्त्रामध्ये कोकेन लपवल्याचं दिलून आलं.
“अनेक जण आपल्या अंगामध्ये वा गुप्तांगांमध्ये लपवून अमली पदार्थांचं स्मगलिंग करतात. मात्र आपल्या स्तनांचं इंप्लांट करत त्यात कोकेनचं स्मगलिंग करण्याची घटना प्रथमच घडत आहे. ही तरुणी दक्षिण अमेरिकेतून येत होती. दक्षिण अमेरिकेमध्ये कोकेनचं सर्वाधिक उत्पादन होतं.” असं
स्पेन पोलिसांनी सांगितलं.