इंडोनेशियात माऊंट सिनाबुंग ज्वालामुखीचा उद्रेक

Updated: Jun 30, 2014, 05:24 PM IST
इंडोनेशियात माऊंट सिनाबुंग ज्वालामुखीचा उद्रेक title=
फाईल फोटो

 

 

जकार्ता : इंडोनेशियामध्ये माऊंट सिनाबुंगला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं त्यामधून येणाऱ्या गरम लाव्ह्याच्या ज्वाळा चार हजार मीटरपर्यंत आकाशात पोहचल्या. याची माहिती मीडियाच्या अहवालानूसार देण्यात आली आहे. 

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला आणि त्याच्या ज्वाळा आकाशात 4 हजार मीटर उंचीपर्यंत गेल्या होत्या. 

सुमात्रा बेटामध्ये 400 वर्षापूर्वी विसावलेला ज्वालामुखी सप्टेंबर ते फेब्रुवारीमध्ये थोडा थोडा फुटत होता. त्याच्यामुळं आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू आणि 30 हजार लोक विस्थापित झाले आहेत. 

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आतापर्यंत त्या स्थानापासून 14,382 लोकं निघून गेले आहे. माऊंट सिनाबुंग इंडोनेशियातील 120 सक्रिय ज्वालामुखींमधला एक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.