नॉर्थ डकोटा : शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केवल अभ्यास शिकण्यावर आणि शिक्षकांचे शिकविण्यावर राहवे यासाठी अमेरिकेत शाळांनी जीन्स वापरण्याबाबत एक योजना आखली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात मुलींनी घट जीन्स घालण्यावर बंदी लागू केली आहे.
या नियमाबाबत शाळेय विद्यार्थी नाराज आहेत. शाळेतील एक सिनिअर विद्यार्थीनी मारिया फिक्सेनने सांगितले, आम्ही हॉट दिसण्यासाठी टाईट जीन्स घालत नाही. तर सर्वच जण वापर करीत आहेत. त्यामुळे आम्ही अशा जीन्स घालतो.
शाळेतील उपमुख्याध्यापक सांगतात, ही नविन योजना मुलींनी पॅन्ट घालण्यावर आक्षेप नाही. मात्र, अशा पॅन्टमुळे मुलांचे अभ्यासातील लक्ष विचलित होते किंवा दुसरीकडे जाते. पर्यायाने अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे घट्ट पॅन्टवर बंदी आणली आहे. मुली केवळ चांगल्या महिलांना पाहण्यासाठी सिनेमा पाहतात. मुख्यव्यक्तीरेखेनुसार सुंदर दिसण्याची तुलना केली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.