www.24taas.com, लोबाम्बा
महिलांनी जर मिनी स्कर्ट घातला, तर त्यांना अटक करण्यात येईल असा इशारा स्वाझीलंड सरकारने दिला आहे. मिनी स्कर्टमुले महिलांच्या मांड्या आणि पोटाचा भाग दिसत असतो. त्यामुळे असा पोषाख उत्तेजित करणारा ठरतो.
१८८९ सालच्या एका कायद्यानुसर मिनी स्कर्ट्स, शॉर्ट स्कर्ट्स हे अनैतिक कपडे मानून महिलांच्या अशा कपड्यांबद्दल कुणी तक्रार नोंदवल्यास पोलीस महिलेवर कारवाई करू शकतात. हा कायदा पुन्हा लागू करण्यात आल्याचं पोलीस प्रवक्त्या वेंडी लटा यांनी या नव्या कायद्याबद्दल माहिती दिली. स्वाझीलंड हा आफ्रिकेतील पुढारलेला देश आहे.
‘अर्धवट कपडे घातल्यामुळे बालात्काऱ्यांचं काम सोपं होतं. तोकडे कपडे घालून महिला अनावश्यक स्वरुपात इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात.’ असं विधान वेंडी यांनी केलं आहे. नोव्हेंबरमध्ये स्वाझीलंडमध्ये झालेल्या एका बलात्काराचा जेव्हा महिलांनी मिनी स्कर्ट घालून विरोध केला. तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवून धरलं होतं.
२०० साली सरकारने सांगितलेल्या कायद्यानुसार १० वर्षांवरल स्त्रियांनी गुडघ्यापर्यंतचे लांब स्कर्ट घालणं आवश्यक आहे. हा कायदा व्यभिचार आणि एड्सचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने बनवला आहे. मात्र मातृत्व लाभलेल्या महिला स्तनपानाच्या सोईसाठी कमी कपडे घालू शकतात.