आफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!

दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 20, 2013, 06:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, केपटाऊन
भारतात सर्वाधिक मंदिरं ही शिवशंकराची आहेत. हिंदू धर्मातील महादेव मानल्या जाणाऱ्या भगवान शंकरांचा निवास कैलाश पर्वतावर मानला जातो. तर ठिकठिकाणी त्यांची स्वयंभू शिवलिंग आहेत. पण नुकतंच दक्षिण आफ्रिकेतल्या एका गुहेत चक्क ६ हजार वर्षांपूर्वीचं शिवलिंग आढळलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे. तसंच आफ्रिकेमध्येही पूर्वी हिंदू धर्माचं पालन होत असल्याची माहिती पुढे आली आहे. पुरातत्व खात्याच्या लोकांना आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे, की इतकी वर्षं हे शिवलिंग सुरक्षित कसं राहिलं!
विशेष म्हणजे नुकतंच जगातील सर्वांत उंच शिवशक्तीचं शिल्प दक्षिण आफ्रिकेत निर्माण केलं गेलं आहे. हे शिल्प तयार करायला १० कलाकारांना १० महिने लागले होते. सर्व शिल्पकार भारतीय होते. शिवशिवशक्तीचं शिल्प २० मीटरहून उंच आहे. यासाठी ९० टन स्टील वापरलं गेलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.