कोलंबिया : स्त्रेयपोव्ह चान ही कोलंबियातील तरूणी काही वर्षापूर्वी वेश्या व्यवसायाच्या जोखाडातून बाहेर पडली. चानने ही कथा सर्वांसमोर मांडली, ही कथा अतिशय वेदनादायी होती.
चान सध्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करते, बालपण चानचं अतिशय आनंदात गेलं, ती आपल्या आईवडिलांसह पाच भावंडांसोबत आनंदात राहत होती. छोटेसे घर आणि तांदळाची शेती होती. तिच्या वडिलांना तिला खूप चांगलं शिकवायचं होतं, पण तिच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला, त्यानंतर तिचे जीवन बदलून गेले.
वडिलांच्या मृत्यूनंतर घरावर गरीबीचं सावट आलं, आईच्या स्वभावातही मोठा बदल झाला, आमच्या जीवनातील प्रेम नाहीसं झाल्यासारखं झालं, आम्हाला घर सोडून झोपडीत यावे लागले, आमची परिस्थिती वेगाने खालावली.
वयाच्या सातव्या वर्षी चानच्या आईने तिला घरकाम करण्यासाठी विकले, तिला पुढे दुसऱ्याला विकण्यात आले, तिला डांबून ठेवण्यात आलं, कस्टमर तिच्याकडे पाठवण्यात आले, पण तिचा विरोध होता, त्यावर तिला त्रास देण्यात सुरूवात झाली, तिच्या अंगावर मुंग्या सोडण्यात आल्या. नंतर मिरचीपूड तिच्या गुप्तांगात टाकण्यात आले, त्यानंतर काही दिवसाने एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केला.
तिला दररोज २० ग्राहकांचा कोटा देण्यात आला, तो नाही भरला, तर तिला इलेक्ट्रीक शॉक देण्यात यायचे, ती खोलीत पोहोचत नाही, तितक्यात कस्टमर येत होते. तो एक गँगरेप होता, असं चान म्हणते.
तिने एकदा ग्राहक लघुशंकेला गेला असताना पळण्याचा प्रयत्न केला, पण ती गेटवर पकडली गेली, तिला मारहाण झाली, फटके देण्यात आले, कातडी निघेपर्यंत मारले, त्यावर मिरच्या चोळल्या.
यानंतर आणखी दुसऱ्या वेश्यालयात तिला विकण्यात आलं, तिथे तिने पळण्याचा प्रयत्न केला, तो देखील असफल झाला, तिसऱ्या वेळेस ती पळाली आणि पोलिसांना जाऊन भेटली, पोलिसांनी तिला सुधारगृह चालवणाऱ्या महिलेला भेटवलं, आता ती एका सामाजिक संस्थेत तिच्यासारख्या मुलींसाठी काम करतेय.