www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.
महिला केैदींना जेलचे कर्मचारी दारू आणि सिगरेट पुरवतात. मात्र, याबदल्यात त्यांना सेक्ससाठी मजबुर केले जात आहे. यावर जेलमधील सेक्स या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने यावर प्रकाश टाकला आहे. या आगोची स्थापना समाजसेवी संस्था हॉवर्ड लीग फॉर पिनल रिफॉर्मने केली आहे.
या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार जेलमधील काही महिला कैदी आपल्याला सुविधा मिळण्यासाठी जेल कर्मचाऱ्यांसाठी संबंध ठेवण्यास राजी होत आहेत. तर काहींना सेक्स करण्यासाठी या महिला मजबूर करत आहेत. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील सेक्सबाबत पहिली समीक्षा करण्यात आली आहे.
या अहलातून स्पष्ट झाले आहे की, ब्रिटन तरुंगांतील महिला असुरक्षित आहेत. पुरुषांपेक्षा या महिला यौन शोषणच्या शिकार होवू शकतात, असा अधिक धोका आहे. या सेक्समधील अडलेली महिला दुसऱ्या कैदी महिलेला आपल्या जाळ्यात ओढून त्यांनाही सेक्ससाठी फसवून प्रवृत्त केले जात आहे.
त्यामुळे जेलमधील कैदी महिला यौन शोषणाची शिकार होत आहेत. हा धोका अधिक वाढू शकतो. मात्र, असे असताना त्यांची योग्य देखभाल किंवा काळजी घेण्यास प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, याबाबत या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, या अहवालावर तुरुंग अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना ही घटना दुर्मिळ आहे,असे म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.